यावल-रावेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी फैजान शाह
Faizan Shah as President of Yaval-Raver Vidhan Sabha Youth Congress यावल : यावल-रावेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी फैजान शाह यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यापूर्वी या पदासाठी सैय्यद असद अहमद यांची प्रांत अध्यक्ष नाना पटोलेे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र ही नियुक्ती रद्द ठरवण्यात आली असून या पदासाठी पुनश्च फैजान शाह यांची निवड करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने युवक काँग्रेसला संघटनात्मक अधिकार दिले असून विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हे निवडणुकीप्रमाणे निवडून येणारे पद असून पक्षाला तोडण्याचे काम करू नये तसेच येत्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे, असे आवाहन फैजान शाह यांनी केले आहे.







