राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला
Rashmi Shukla as State Director General of Police मुंबई :राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शुक्ला यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता व हा अंदाज खरा ठरला आहे. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
सहा महिने मिळणार कार्यकाळा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकार्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर गुरुवारी शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्ला यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. प्रसंगी त्यांना मुदतवाढही मिळण्याची शक्यता आहे.









