भुसावळात जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध : भाजपाने जाळला प्रतीकात्मक पुतळा


Protest against Jitendra Awha’s statement in Bhusawal : BJP burnt symbolic effigy
भुसावळ :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भुसावळातील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवार, 4 जानेवारी रोजी आमदार आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली.

पदाधिकार्‍यांनी जाळला पुतळा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने देशभरात या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. भुसावळ येथे आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी आमदार संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती होती. पुतळा जाळताना भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.


यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी, प्रमोद सावकारे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, बापू महाजन, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अजय नागराणी, गिरीश महाजन, निक्की बत्रा, पवन बुंदेले, प्रा.दिनेश राठी, देवेंद्र वाणी, पिंटू ठाकूर, विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, आनंद ठाकरे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, भैय्या महाजन, ओबीसी मोर्चा सचिव प्रवीण इखणकर, नरेंद्र पाटील, प्रशांत देवकर, वसंत पाटील, प्रा.प्रशांत पाटील, शंकर शेळके, डॉ.पवन सरोदे, सुमित बर्‍हाटे, रवींद्र ढगे, चेतन बोरोले, साजीद शेख, राहुल तायडे, बी.एन.पाटील, राजू कुळकर्णी, आशिष पटेल, नागेश खरारे, देवेंद्र फालक, लोकेश ठाकूर, कौतीक ठोंबरे, गोपी राजपूत, भावेश चौधरी, प्रशांत भट, हिमांशू दुसाने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

आव्हाडांनी माफी मागावी : आमदार
जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आमच्या सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी, असे आमदार संजय सावकारे यावेळी म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !