साकळी येथून रविवारी श्री क्षेत्र शेगाव पदयात्रा रवाना होणार


Sri Kshetra Shegaon padayatra will leave from Sakli on Sunday भुसावळ : श्री सच्चिदस्वरुप बहुउद्देशी संस्था संचलित श्री गजानन महाराज फाऊंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे आयोजन रविवार, 7 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. साकळी ते शेगाव पदयात्रेचे यंदाचे 13 वे वर्ष आहे. साकळी, यावल व परिसरातील तब्बल 125 भाविक पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या पदयात्रेसाठी भाविकांची नावनोंदणी सुरू आहे.

पदयात्रेचे यंदा 13 वे वर्ष
साकळी, ता.यावल येथील मनवेल रोडवरील जोशी फार्ममधील श्री गजानन महाराज देवस्थानातून 7 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरवात होईल. पदयात्रेचा भुसावळ, मुक्ताईनगर, वडनेर भोलजी व खामगाव येथे मुक्काम राहिल. पदयात्रेत दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी 11 वाजता श्रींची महाआरती, सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ, सायंकाळी सात वाजता शेजारती आदी नित्योपासना होतील. साकळी ते शेगाव पदयात्रेचे साकळी गावात यंदाही जल्लोषात स्वागत केले जाईल. लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते मुख्य चौकात पूजन होऊन पदयात्रेचे स्वागत होईल. यासह गावात विविध भागांमध्ये श्रींच्या रथावर फुलांची उधळण करुन स्वागत केले जाईल. टाळ मृदंगाच्या गजरात पदयात्रा शेगावकडे रवाना होणार आहे. येथून पदयात्रा शिरसाड मार्गे भुसावळकडे प्रयाण करेल. यंदा पदयात्रेचे 13 वे वर्ष आहे.



गुरुवार. 11 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पदयात्रा शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचल. या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे रथाचे स्वागत होऊन पदयात्रेकरुना कापड प्रसाद वितरण केले जाईल. पदयात्रेत सहभागासाठी नाव नोंदणी अत्यावश्यक राहणार असल्याने परिसरातील भाविकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी श्री गजानन महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, वासुदेव मोते, पितांबर बडगुजर, हर्षल बाविस्कर, मुकेश बोरसे आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !