सावित्री माईंच्या परीश्रमामुळेच स्त्री सामर्थ्यवान : विजया बोरकर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण
Women are strong only because of the efforts of Savitri Mai: Vijaya Borkar
भुसावळ : माता सावित्रीमाईंच्या त्याग आणि अथक परीश्रमातूनच आजची स्त्री सामर्थ्यवान बनली आहे. मी आज या पदावर केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच असल्याचे प्रतिपादन महानिर्मितीच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता विजया बोरकर यांन केले. दीपनगर वीज केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतीसूर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील 12 शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सेवा पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. यावेळी मानव सेवा ईश्वर सेवा संस्थेच्यावतीने निंभोरा येथील जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थी दत्तक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शिक्षिका भारती सुदाम अवचारे यांच्या सावित्रीबाई वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी भुसावळ वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड होते. प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मितीच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता विजया बोरकर, प्रकल्प 660 चे मुख्य अभियंता विवेक रोकडे आणि उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम उपस्थित होते. वीज कर्मचारी आणि शिक्षक दोघंही प्रकाश पेरण्याचे कार्य करतात.


शिक्षकांकडून समाजातील अंधार दूर
वीज कर्मचारी घरातील अंधार दूर करतात तर शिक्षक समाजातील अज्ञानरूपी अंधार दूर करतात, असे विचार प्रा.डॉ.जतीन श्रीधर मेढे यांनी व्यक्त केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या पुरस्काराच्या प्रकाश किरणांनी आपण विद्यार्थ्यांमध्ये समतेची…. ममतेची…. ज्ञानज्योत पेटवून आधुनिक भारतासाठी आदर्श विद्यार्थी घडवावेत कारण हुशार विद्यार्थी शाळेत घडतात तर वाईट विद्यार्थी देखील शाळेतच घडतात हे आपण कदापी विसरता कामा नये, असेही ते म्हणाले. यावेळी लक्ष्मी अनुप माळी या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारार्थीमधून चाळीसगावच्या प्रा.डॉ.उज्वला पंकज नन्नवरे आणि मुक्ताईनगरचे अ.फ.भालेराव यांनी बहारदार संस्कारक्षम चारोळी आणि लघू कथाच्या माध्यमातून आपल्या मनोगताची मांडणी केली. प्रस्तावना मानव सेवा ईश्वर सेवा संस्थापक मोहन सरदार यांनी केली.
यांची प्रमुख उपस्थिती
उप मुख्य अभियंता अशोक भगत, रवींद्र सोनकुसरे, मनोहर तायडे, संतोष वकारे, प्रशांत लोटके, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, अधीक्षक अभियंता सुमेध मेश्राम, रवींद्र डांगे, महेश महाजन, सुनील पांढरपट्टे, अशोक घाडगे, योगेश इंगळे, अतुल पवार, संजय हिरवे, डॉ.कल्पना बावा, संदीप वाघ, डॉ.रोहिणी गायकवाड, शारदा ईशी, सुनीता सरदार, वर्षा खंडारे, मिलिंद खंडारे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सरदार, पत्रकार प्रकाश तायडे सुनिल आराक आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन हर्षिता जांभुळकर यांनी तर आभार विनायक बोराटे यांनी मानले
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
यशस्वीतेसाठी बाबा जावळे, अनुप माळी, महेश झगडे, छगन पवार, शैलेष नारखेडे, प्रफुल निकम, मोहिनी फेगडे, विनायक बोराटे, नंदकिशोर उमाळे, महेश चरखे, किरण चोपडे, संदीप उमाळे, विनायक जाधव, संदीप उमाळे, संतोष गिर्हे, मनिषा माळी, प्रवीण बोदडे, इरफान पठाण यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, पत्रकार , अधिकारी कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार तसेच मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.





