भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे 3 मार्च रोजी महिला रन


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित षबीसारा लेडीज इक्वलिट रन’ या खास महिलांसाठीच्या रनची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भुसावळ शहरातील कोरोनेशन क्लब येथे 3 मार्च रोजी हा रन आयोजित केला जाणार आहे. रन हा केवळ महिलांसाठी असून पुरुष सदस्य अथवा कुठलीही तृतीयपंथी व्यक्ती या रनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. सदरच्या रनसाठी नावनोंदणी रविवार, 7 जानेवारीपासून सुरू होत आहे.

ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणीची सुविधा
नावनोंदणी ऑफलाइन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने महिला सदस्य करू शकतात. ऑफलाइन नावनोंदणीसाठी डॉ चारुलता पाटील (सुप्रभा हॉस्पिटल, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, भुसावळ, मोबाईल क्रमांक 9823799758) व डॉ .नीलिमा नेहेते (नेहेते हॉस्पिटल,अष्टभुजा मंदिराजवळ, भुसावळ, मोबाईल 9325638717) यांच्याशी संपर्क करता येईल. त्याचबरोबर ऑनलाईन नावनोंदणी ीेुंपीलीळिीं या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यासाठी प्रवीण पाटील (मोबाईल क्रमांक 9422772178) यांच्याशी संपर्क करता येईल.



यावर्षी ही स्पर्धा 3 किमी, 5 किमी व 10 किमी या तीन श्रेणींमध्ये घेतली जाणार आहे. नावनोंदणी शुल्क तीन किमीसाठी 350 रुपये, पाच किमीसाठी 500 रुपये व 10 किमीसाठी 700 रुपये निर्धारित करण्यात आले आहे. 5 किमी व 10 किमीचा रन हा आर एफ आय डी प्रणालीद्वारे टाईम रन असेल. म्हणजेच या श्रेणीमध्ये धावणे पूर्ण झाल्यानंतर सहभागी महिलेला लागलीच आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर किती मिनिटात स्पर्धा पूर्ण केली याचा संदेश प्राप्त होईल व त्याशिवाय ऑनलाइन पद्धतीने प्रमाणित वेळेचे प्रमाणपत्र देखील मिळेल. या रनचे हे सलग चौथे वर्ष असून याआधीच्या तीनही सत्रांमध्ये भुसावळ शहरातील महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता व त्यातील काही महिला नियमित धावायला लागून त्यांच्या आरोग्याच्या संबंधित इतर समस्याचे निराकरण झालेले असून आज त्या सुदृढ आयुष्य जगात आहेत. त्यामुळे यावर्षीच्या रनमध्ये देखील अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !