भुसावळात लेवा समाज सामूहिक विवाह सोहळ्यात 12 जोडपी विवाह बंधनात


12 couples tied the knot in Bhusavalat Lewa Samaj mass wedding ceremony भुसावळ  : भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे आयोजित आठव्या सामूहिक विवाह सोहळ्यात 12 जोडपी विवाहबद्ध झाली. शहरातील संतोषी माता हॉलमध्ये शनिवार, 6 जानेवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शनिवारी आयोजित केलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी विवाहबद्ध होणार्‍या मुला मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन केले. संसारात कसे वागायचे, कसे राहायचे, एकमेकांना समजून घ्यावचे याचे मार्गदर्शन केले. यानंतर विवाह विधी पार पडला.

यांची विवाह समारंभाला उपस्थिती
या विवाहासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, भावी कुटुंब नायक ललित पाटील, संभाजीनगरचे उद्योगपती वसंत पाटील, भंगाळे गोल्डचे भागवत भंगाळे यांची विशेष उपस्थिती होती.


भोरगाव लेवापंचायतच्या कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली व समाजातील खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा, व चुकीच्या पध्दती बंद व्हायला पाहिजे यासाठी हा सोहळा घेत असल्याचे आयोजकांनी सांगितले. विवाहासाठी भुसावळ भोरगाव लेवा पंचायतचे अध्यक्ष, सचिव, प्रकल्प चेअरमन आदी सदस्य, पदाधिकारी बाहेरगावचे समाज बांधव तसेच वधू-वरांकडील प्रत्येकी सात जण असे विवाह सोहळ्याला हजर होते.

विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला भोरगाव लेवा पंचायतीतर्फे मंगळसूत्र, जोडवे, कपडे, भांडे, देवाच्या मूर्ती, गॅस हंडी, शेगडी, मिक्सर, कुकर आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !