मुक्ताईनगरात अभिमंत्रित अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा
A grand procession of Akshada Kalash invited to Muktainagar मुक्ताईनगर : अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्यामधील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या अभिमंत्रीत निमंत्रण अक्षदांचे शहरात आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी श्री नागेश्वर मंदिरात अयोध्या येथे गेलेले सर्व कारसेवक आमदार एकनाथराव खडसे, दलपत चव्हाण, एस.टी.सरोदे, मधू चव्हाण, राजू खेवलकर, सुनील श्रीखंडे, सतीश चौधरी ,संजय काळे, दादा काठोके, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते अक्षदा कलशाचे पूजन करण्यात आले.
शोभायात्रेने वेधले लक्ष
नागेश्वर मंदिरापासून राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आल. शोभायात्रेत श्री एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, स्व.निखीलभाऊ खडसे स्कूल, वारकरी शिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम यांच्या जीवनपटावरील वेशभूषा साकारून सहभाग घेतला. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी, श्री स्वामी समर्थ इस्कॉन ग्रुप, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, यांच्यासह विविध गणेश मंडळ, छत्रपती ग्रुप, श्री दुर्गा मंडळ, व्यायामशाभेचे पदाधिकारी, गावातील माता-भगिनी नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले. ते शोभायात्रेदरम्यान नागरिीकांतर्फे तसेच डॉ.हेडगेवार व्यापारी संकुल येथे सर्वांना पाणी, बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. भव्य शोभायात्रेचा समारोप श्रीराम मंदिरात श्री रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठणाने झाला. यावेळी इस्कॉन ग्रुपतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला.


यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परीषदेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पदाधिकारी, बाळासाहेब कुलकर्णी, पंकज चौक, योगेश नेटके, तालुका व्यवस्थाप्रमुख राजेश पाटील, जागरण गटप्रमुख मनीष चौधरी, कबचौ उमवि सिनेट सदस्य, दिनेश चव्हाण, प्राचार्य अनिल पाटील, कुणाल सोनार, अजय काठोके, प्रमोद कपले, विशाल सापधरे, अमोल कपले, विकी राणे, ठाकरे, राहुल जावरे आदींनी परीश्रम घेतले. हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत मंदिर व्हावे अशी इच्छा करोडो हिंदू बांधवांची होती. यासाठी पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला. या मोठ्या संघर्षानंतर भव्य श्री राम मंदिर उभारले गेले. त्यात 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत याचा मुक्ताईनगर येथील श्रीराम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
नागेश्वर मंदिरापासून शोभयात्रेला सुरुवात झाली. प्रवर्तन चौक, बसस्थानक, पेट्रोल पंप, तहसील कार्यालय, आनंद ट्रेडर्स या मार्गे शोभायात्रा निघाल्यानंतर श्रीराम मंदिरावर तिचा समारोप करण्यात आला. कार सेवकांपैकी आमदार एकनाथराव खडसे, दलपत चव्हाण, एस.टी.सरोदे, मधू चव्हाण, राजू खेवलकर, सुनील श्रीखंडे, सतीश चौधरी, संजय काळे, दादा काठोके यांची उपस्थिती होती.





