पत्रकार समाजाचे दर्पण : त्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे : आमदार किशोर पाटील

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त भडगावात रक्त तपासणी शिबिर


भडगाव : पत्रकार हे समाजाचे दर्पण असतात. ते समाजातील समस्यांना वाचा फोडतात आणि जनजागृती करतात त्यामुळे पत्रकारांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. या शिबिरामुळे पत्रकारांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. तसेच पत्राकार व वृत्तपत्रा विक्रेते यांनाही मोठी मेहनत करावी लागते. वृत्तपत्र विक्रेत्यांचा जो सन्मान पत्राकार संघामार्फत करण्यात आला. हा कौतुकास्पद विषय असल्याचेही गौरवोदगार पाचोरा-भडगाव मतदारंसघाचे आमदार किशोर पाटील यांनी काढले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त भडगावात रक्त तपासणी शिबिरप्रसंगी ते बोलत होते.

भडगाव पत्रकार दिनानिमित्त शिबिर
पत्रकार दिनानिमित्त व पत्रकाराचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भडगाव तालुका यांच्या मार्फत भडगांव येथे विनामूल्य रक्तगट तपासणी व इतर सर्व रक्त तपासण्या करण्यात आल्या. यावेळी मान्यवरांचे हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. या रक्त तपासणी शिबिराचे उद्घाटन पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील हे होते. यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी विनामूल्य रक्ताच्या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम भडगाव येथील श्री.नारायणभाऊ मंगल कार्यालयात शनिवार, 6 रोजी दुपारी तीन वाजता झाला.


यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव तालुका तहसीलदार मुकेश हिवाळे, पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भडगाव तालुकाअध्यक्ष अशोक परदेशी, भाजपा सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, शेतकरी संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष विजय साळुंखे, श्री नारायणभाऊ महाजन मंगल कार्यालयाचे संचालक सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी केले. रक्त तपासणी शिबिरासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालय महालॅब यांचे जुबेर पठाण यांच्यासह टिमचे अनमोल सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भडगाव तालुका सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव हे उपस्थित होते.

चांगले उपक्रम यापुढेही राबवणार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक परदेशी म्हणाले की, पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघामार्फत रक्त तपासणी शिबिर हा एक चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. पत्रकार संघामार्फत यापुढेही चांगले उपक्रम राबविले जातील, असे अशोक परदेशी म्हणाले. जुन्या पेन्शन योजनेचे लढवय्ये संजय सोनार कळवाडीकर यांनी आमदार किशोर पाटील यांच्यासह शासनाचे आभार मानले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी कार्यक्रमाला भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, भडगाव तालुका कृषी अधिकारी परेशचंद बागले, मंडळ कृषी अधिकारी पी.एन.खाडे, कृषी सहाय्यक सचिन पाटील, कृषी सहाय्यक सुखदेव गिरी, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईम्रान अली सैय्यद, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, माजी नगरसेविका योजना पाटील, दक्षता व पुरवठा समितीचे माजी अध्यक्ष प्रा.गुणवंतराव अहिरराव, सामाजिक कार्यकर्ते हाजी जाकिर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते नाजीम बेग मिर्झा, ग.स.चे माजी चेअरमन विलासराव नेरकर, मानव राज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष निलेश मालपुरे, गरीब नवाज खिदमत फाउंडेशनचे मुजम्मील, दानिश शेख, जमाल कासार, मनसेचे अमोल कांबळे, बजाज शोरूमचे संचालक रावसाहेब पाटील, भारतीय काँग्रेस पक्षाचे भडगाव तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, वडजीचे प्रदीप पाटील, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष आबा चौधरी, भडगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष मुकुंद पाटील, प्रहार अपंग संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राजू परदेशी यांचेसह विविध संघटना, पक्षांचे पदाधिकारी, नागरीक, पञकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श शिक्षक प्रवीण पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार नरेंद्र पाटील यांनी मानले.

यांचा झाला सन्मान
वृत्रपत्र विक्रेते राजु दिक्षित, देविदास वाणी, प्रशांत खांडेकर , योगेश दिक्षीत, जितेंद्र दिक्षीत आदिंचा तसेच प्रविण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गणेश पाटील तसेच समाजसेवक विजय साळुंखे, निलेश मालपुरे , जुन्या पेन्शन योजनेचे लढवय्ये संजय सोनार कळवाडी यांचाही सत्कार आमदार किशोर पाटील यांनी पुष्पगुच्छ देउन केला. महाराष्टृ राज्य मराठी पञकार संघटना भडगाव तालुका अध्यक्ष म्हणुन अशोक परदेशींची निवड झाल्याने अशोक परदेशी यांचाही सत्कार आमदार किशोर पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देउन केला.कार्यक्रम यशस्विततेसाठी पत्रकार संघटना पदाधिकारी, सर्व पञकार बांधवांचे तसेच सुनिल महाजन, भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या महालॅबच्या कर्मचार्‍यांचे अनमोल सहकार्य लाभले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला पञ्त्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष अबरार बेग मिर्झा, तालुका उपाध्यक्ष भास्कर पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निलेश पाटील, रविंद्र पाटील, तालुका संघटक अमिन पिंजारी, भडगाव शहराध्यक्ष मनिष सोनवणे, शहरउपाध्यक्ष संजय शेवाळे, तालुका प्रसिद्धीप्रमुख सतीष पाटील, तालुका सदस्य रतिलाल पाटील, संजय पाटील, नरेंद्र भोसले, अलिमशहा, भरत चव्हाण, चेतन महाजन, अयुम बेग यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !