भुसावळ रनर्स असोसिएशनचे पाच पाच धावपटू ‘रन फॉर वरणगाव’ स्पर्धेत विजयी


Five runners of Bhusawal Runners Association won the ‘Run for Varangaon’ competition भुसावळ :वरणगाव सिविल सोसायटीतर्फे रन फॉर वरणगाव ही पाच व दहा किलोमीटर अंतर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे तब्बल 58 धावपटू सहभागी झाले होते. त्यात 35 महिला धावपटू होत्या. पाच किमी स्पर्धेत महिलांच्या गटात सुनीता संजयसिंग या प्रथम आल्या तर 10 किमी महिलांच्या गटात रीना परदेशी प्रथम तर विनिता शुक्ला या द्वितीय ठरल्या. त्याचबरोबर 10 किमी पुरुषांच्या गटात राजेंद्र ठाकूर प्रथम तर निलेश पाटील द्वितीय ठरले. व्यासपीठावर भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक, डॉ.राजेश मानवतकर, डॉ.राहुल भोईटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

भुसावळातील धावपटूंंचा सहभाग
रविवारी सकाळी सात वाजता वरणगाव येथून या स्पर्धेस सुरुवात झाली. स्थानिक वरणगावातील नागरीकांनी धावपटूंचे टाळ्या वाजवून स्वागत केले. प्रीती पांडा, गुड्डी देवी, पिंकी सिंग, मनीषा सिंग, शीला कश्यप, राधा पाटील, सुनीता वाघमारे, माधुरी गव्हाळे, विजया निकम, सुनीता रंजन सिंग, सीमा वायकर, गुंजन गुप्ता या महिला धावपटूंनी सहभाग नोंदवला. भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या महिला सदस्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हे शक्य असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.


डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.स्वाती फालक, पूनम भंगाळे, माया पवार, मंजू शुक्ला, ज्योती सिंग, ममता ठाकूर, डॉ.वर्षा वाडिले, एकता भगत, माधुरी चौधरी, सविता घाटे, किर्ती मोताळकर, पुष्पलता चौधरी या महिला धावपटूंनी देखील 10 किलोमीटर अंतर सहज धावून पूर्ण केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !