राहुल नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची ? आदित्य ठाकरे
What to expect from Rahul Narvekar ? Aditya Thackeray मुंबई : राज्यातील अपात्रता प्रकरणात मोठा निर्णय समोर आला असून सर्व आमदारांना पात्र ठरवण्यात आले असलेतरी खरी शिवसेना ही शिंदे यांचीच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राहुल नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची, कारण सर्व काही सेटिंग झाली आहे.
गद्दारांच्या टोळीप्रमुखाने हे सर्व केले
आदित्य ठाकरे म्हणाले, ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी, तुरुगांत जाण्यापासून वाचवण्यासाठी गद्दारांच्या टोळीच्या प्रमुखाने हे सगळे केले. उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांनी स्वतःची काळजी घेतली नाही, या जनतेची काळजी घेतली. काय दिलं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्रीपद दिलं, ओळख दिली त्यांनाच फसवलं. किती काळं मन असेल या माणसाचं. ज्या माणसाला बेडवरून उठता येत नाही, त्यावेळी गद्दारी केली. गोव्यात जाऊन कसे नाचले बघितला का? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.







