MLA Disqualification Case व्हीप मोडूनही शिंदे सेनेचे आमदार पात्र कसे ? : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा सवाल
Even after breaking the whip, how is the MLA of Shinde Sena qualified ? : NCP President Sharad Pawar’s question पुणे : व्हीपचे उल्लंघण करणार्यांवर कारवाई केली जाते मात्र इथे व्हीप मोडला म्हणून शिंदेंच्या लोकांसंबंधी कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून करण्यात आली होती मात्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांचे आमदार पात्र ठरवले आहेत त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात जाणे उद्धव ठाकरे यांना सोयीचे होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल बुधवारी समोर आल्यानंतर त्यांना शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे शिवाय सर्व आमदारांना पात्रही ठरवले आहे. या निकालाचे राज्यात जोरदार पडसादही उमटत आहेत.
सुप्रीम कोर्टात दाद मागणे योग्य
शरद पवार म्हणाले की, निकालाबाबत जी खात्री होती ती यात दिसेल असं ध्वनीत केलं जात होतं तसाच निकाल देण्यात आला. या निकालाबाबत वकिलांशी चर्चा केल्यावर अधिक स्पष्टता येईल. हा निकाल वाचल्यानंतर उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागेल, असे शरद पवार म्हणाले.



विधिमंडळात बहुमत कुणाचं आहे? व्हीप कुणाचा आहे? व्हीप देण्याचा अधिकार कुणाचा आहे. व्हीप किंवा कुठला आदेश देण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे. व्हीपची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं केलेली नाही. दहाव्या अनुसूची राजकीय पक्षांना दिशा देणारं प्रकरण आहे, असेही शरद पवार म्हणाले.
शिंदेंच्या गटाकडून ठाकरेंचे आमदार अपात्र करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अध्यक्षांनी ठाकरेंचे आमदार पात्र ठरवले. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांना बगल देण्याची भूमिका घेतली गेली आहे, असेही शरद पवार म्हणाले.






