भुसावळ मतदार संघातील मतदान केद्रांची अधिकार्‍यांकडून पाहणी


Inspection of polling stations in Bhusawal Constituency by officials भुसावळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि झोनल अधिकार्‍यांकडून तालुक्यातील मतदान केद्रांची पाहणी 4 ते 8 दरम्यान करण्यात आली. मतदान केद्रांची स्थिती, संवेदनशीलता त्या भागात आहे का, मतदान केंद्रात हवा, उजेड, पाणी, लाईट, रॅम्प आहे का याची पाहणी करून त्याचा अहवाल प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.

सुविधांची पाहणी करीत करीत प्रांतांना सोपवला अहवाल
शहरातील आणि ग्रामीण भागातील 314 मतदान केद्रांची पाहणी करण्यात आली. मतदान केंद्राच्या परीसराची पाहणी करण्यात आली. पालिकेचे अधिकारी, तसेच अन्य शासकीय कार्यालयाचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी केली. मतदान केंद्राचा परीसर कसा आहे, मतदान केंद्रात उजेड, हवा येते का नाही, मतदान केंद्रात लाईटाची व्यवस्था आहे का नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का नाही, रॅम्प आहे का नाही ? याची पाहणी करून प्रत्येक मतदान केद्रांच्या परीस्थितीचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केद्रांची पहाणी अधिकार्‍यांनी केली. शहरातील व ग्रामीण भागात अधिकार्‍यांकडून पाहणी केली जात आहे. सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील 314 मतदान केद्रांची पाहणी करून पाहणीचा अहवाल प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !