भुसावळातील हिंदी महाविद्यालयास बॉक्सिंग स्पर्धेत ‘चॅम्पियनशीप’


भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाच्या बिसिंग स्पर्धेतील मुलींच्या संघाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठद्वारा आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत पाच सुवर्ण पदकासह विजेता संघ म्हणून चॅम्पियनशीप मिळाली आहे. आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये महिला गटात तीन सुवर्ण तसेच पुरुष गटात दोन सुवर्णपदक व तीन रौप्य पदक जिंकून रनर ऑफ ट्रॉफी विद्यार्थ्यांनी जिंकली.

यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये पुरुष गटात प्रथमेश आव्हाड व नरेंद्र सावरीयाची निवड वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटीसाठी झाली आहे. महिला गटात माया राजपूत व प्रियंका शिरसाळे यांची चंदीगड येथे झालेल्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑल इंडिया इंटर युनिवर्सिटीसाठी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा जालंदर येथे होणार आहे. या उत्तुंग यशाबद्दल हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवीकांतजी परदेशी, सचिव मधुलता शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडियाले, सभापती रमेश नागराणी, सर्व पदाधिकारी मान्यवरांनी व महाविद्यालयीन प्राचार्य डॉ.रमेश जोशी व सर्व प्राध्यापकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंचे डॉ.रमेश जोशी यांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन राष्ट्रीय स्तर स्पधसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा अधिकारी डॉ.प्रवीण जाधव व कोच बाळा मोरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !