प्रत्येकाने संतांची शिकवण आचरणात आणावी : अनिल चौधरी


Everyone should practice the teachings of saints: Anil Chaudhary भुसावळ : समाजाच्या उद्धारासाठी ज्याप्रमाणे संत जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे महान कार्य करून मानवतेची शिकवण दिली त्याचप्रमाणे प्रत्येकाने संतांची शिकवण आचरणात आणावी, असे आवाहन माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधीर यांनी केले. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाजातर्फे खडका रोडवरील समाज भवनात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी श्री संत जगनाडे महाराज यांना अभिवादन केले

यांची विचार मंचावर उपस्थिती
व्यासपीठावर संजय चौधरी, कैलाश चौधरी, गणेश सोनवणे, सचिन पाटील उपस्थित होते. संजय चौधरी यांनी समाज कार्यावर भर देऊन आपण समाज ऋण फेडावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सचिव अशोक चौधरी यांनी केले. सामाजिक कार्यकर्ता संतोष चौधरी (दाढी), शंकर चौधरी, उमाकांत चौधरी, नारायण चौधरी, दौलत चौधरी, सुरेश गंथडे यांच्यासह सर्व समाजबांधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी संजय चौधरी, सुरेश चौधरी, अशोक चौधरी, सुधाकर पाटील, सुनील सर, गणेश सोनवणे, बाळू चौधरी, देविदास चौधरी, किरण चौधरी, गोपाळ चौधरी, सुभाष चौधरी, नरेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, प्रदीप चौधरी, विजय चौधरी, सुनील चौधरी, राकेश चौधरी यांनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !