भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत साखळी उपोषणास सुरवात
भुसावळ : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार दिवसीय साखळी उपोषणास सुरवात झाली आहे. जुनी पेन्शन लागू करावी या एकमेव मागणीसाठी स्थापित जॉइंट फ्रंट क्षहस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शनचे आदेश व आयडीईएफ च्या निर्देशानुसार 8 ते 11 जानेवारी 2024 दरम्यान देशतील केंद्रीय कर्मचारी संस्थानांसमोर साखळी उपोषण केले जात आहे. साखळी उपोषणात संरक्षण, रेल्वे, टपाल, इन्कम टॅक्ससह अन्य केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचार्यांचा सहभाग आहे. सरकारने जेएफआरओपीएस पदाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा केल्यानंतर ही सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. 1 जानेवारी 2004 पासून भरती र्मचार्यांना शेअर मार्केटवर आधारीत नवी पेन्शन ऐवजी गॅरेंटेड जुनी पेन्शन देण्यास सरकारची उदासीनता दिसून येत असल्याने देशातील केंद्रीय कर्मचार्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. त्याचाच साखळी उपोषण हा एक भाग आहे. आगामी काळात जुन्या पेन्शन या एकमेव मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे कॉ. दिनेश राजगिरे जेसीएम मेंबर यांनी सांगितले.
यांचा साखळी उपोषणात सहभाग
कॉ.दिनेश राजगिरे, निलेश देशमुख, आशिष मोरे, किशोर बढे, मोहन सपकाळे, मिलेश देवराळे, योगेश आंबेडकर, पंकज सोनार यांनी उपोषणात सहभाग नोंदवला. युनियनचे अध्यक्ष कॉ.महेंद्र पाटील, मोहम्मद आरीफ, नाना जैन, योगेश जोशी, संतोष बाविस्कर, शेख शकील, राजु तडवी, प्रमोद तायडे, तुषार नाईक, हरीश बाविस्कर, संकेत तायडे, रवी सपकाळे, अर्बाब फारुकी, रजकिरण निकम, राजेंद्र बादशाह हे प्रमुख उपस्थित होते.







