वाचनाने ज्ञानवाढीसह व्यक्तिमत्व होईल सुसंस्कृत : किशोर वायकोळे

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात महावाचन उत्सव


Personality will become cultured with increasing knowledge by reading: Kishore Vaikole भुसावळ : वाचनाने आपल्या ज्ञानात वाढ करून आपण आपले व्यक्तिमत्व सुसंस्कृत आणि समृद्ध बनवू शकतो. वाचन संस्कृती टिकावी म्हणून दररोज दोन पाने तरी वाचायला हवीत, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी येथे केले.

महाराष्ट्र शासनातर्फे चालविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र वाचन चळवळ या उपक्रमांतर्गत मंगळवार, 9 जानेवारी रोजी के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महावाचन पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे बोलत होते. वायकोळे म्हणाले की, शालेय विद्यार्थी हे मोबाईल पासून परावृत्त होऊन त्यांच्यात अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. प्रदर्शनात अनेक वर्षांपासूनची हस्तलिखिते सुद्धा ठेवल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.


याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, शिक्षण विभागातील विषय तज्ज्ञ संजय गायकवाड, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाचे आयोजन विद्यालयाचे ग्रंथपाल व्ही. टी.भंगाळे यांनी केले होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !