बोदवड तालुक्यातील असंख्य मुस्लिम युवकांचा वंचित आघाडी प्रवेश


Many Muslim youths in Bodwad taluka are deprived of access to Agghadi बोदवड : बोदवड तालुक्यातील शेकडो मुस्लिम युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये गुरुवारी उत्स्फूर्तपणे प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्याहस्ते युवकांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

बोदवड तालुक्यातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्याने आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढले आहे. शमीभा पाटील, बाळा पवार यांनी प्रवेशकर्त्यांना मार्गदर्शन करतांना वंचित बहुजन आघाडीची विचारधारा, मुस्लिम समुदायाविषयी पक्षाने वेळोवेळी घेतलेली भूमिका आणि पक्षाची ध्येय धोरणे सांगितली.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, महासचिव अ‍ॅड.योगेश तायडे, महिला महासचिव वंदना आराक, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस तडवी, युवक जिल्हा सचिव शाहरुख शेख, सद्दाम कुरेशी, युवा जिल्हा संघटक मनीष वाकोडे, तालुकाध्यक्ष सुपडा निकम, बोदवड युवा तालुकाध्यक्ष आशिष गुरचळ, महासचिव तनवीर मणियार, महिला तालुकाध्यक्ष प्रमिला बोदडे यांची प्रमुख उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !