काळाराम मंदिरात दर्शन घेणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान
Narendra Modi is the first Prime Minister to visit Kalaram Temple नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौर्यावर आल्यानंतर त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. काळाराम मंदिरात भेट देवून दर्शन घेणार मोदी हे देशातील पहिलेच पंतप्रधान आहते. यावेळी पूजा-अर्चा केल्यानंतर मंदिरातील पुजार्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मोदींकडून रामकुंड येथे जलपूजन आणि गोदावरीची आरतीही करण्यात आली. यावेळी मंदिरात येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिर भगवान श्री राम, माता सीता व बंधू लक्ष्मण यांना समर्पित आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की, 14 वर्षांच्या वनवासात श्रीराम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह पंचवटीत राहिले. यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक असे महत्त्व आहे.









