भुसावळात नमो चषकात प्रभाग 13 मध्ये रंगल्या खो-खो, रस्सीखेच स्पर्धा
Kho-Kho, rope competition was held in Ward 13 in Namo Cup in Bhusawal भुसावळ : शहरात भारतीय जनता पार्टी, भाजयुमो यांच्यातर्फे आयोजीत नमो चषक स्पर्धांमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 13 मधील सरस्वती नगर भागात 100 मीटर धावणे, खो-खो, रस्सीखेच आदी स्पर्धा पार पडल्या. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये 315 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विविध स्पर्धांचे आयोजन
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, संजय आवटे, आदींची उपस्थिती होती. भाजयुमोचे शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरस्वती नगरात हनुमान मंदिर आवारात झालेल्या नमो चषक स्पर्धेत संपूर्ण प्रभाग 13 मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत 100 मीटर धावणे, ेखो-खो, रस्सीखेच स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमधील विजेत्यांची नावे घोषीत करण्यात आली. विजेत्यांचा एकत्रीत पारीतोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत नमो चषकांतर्गत स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, गौरव आवटे, शिक्षक ज्योती सूर्यवंशी, लता वास्कर, विद्या जेधे, संध्या चंदेल, पायल ढेंगे, किशोर टोके, श्वेतांग चंदेल, लाजरस मनी, मनिष सारंगधर पाटील, मयुरेश तायडे, अंकुश पाटील, गोकुळ परदेशी, बडगुजर, राजेंद्र वासकर, रवी शुक्ला, संदीप पाटील, दीपक बर्डे, गिरीश परदेशी, योगेश भावसार, राजेश चंदन, कृष्णा सुरवाडे आदींनी सहकार्य केले.


ज्येष्ठ, महिलांसाठीही स्पर्धांचे आयोजन
नमो चषकाच्या अंतर्गत जेष्ठ नागरीकांसाठीही विविध स्पर्धा होणार आहेत. ज्येष्ठांसाठी रस्सीखेच, गीतगायन, स्लो वॉक अशा तीन स्पर्धा होेणार आहे तर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहेत.





