सुखकर व सुरक्षित प्रवासाची केवळ परीवहन बसेसद्वारे हमी : बंडू कापसे


A pleasant and safe journey guaranteed only by Transport Buses : Bandu Kapse रावेर : आजही प्रवास करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरीकांची व विद्यार्थ्यांची पहिली पसंत ही राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसचीच आहे. बसने प्रवास म्हणजे सुरक्षिततेची हमी, असे प्रवासी आजही समजतात. प्रवासी वाहतूक करत असताना चालक व वाहक यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. प्रवाशांसोबतच आपल्या कुटुंबाचे भानदेखील ठेवणे आवश्यक आहे. वाहन चालविताना कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये अथवा मोबाईलवर बोलू नये, असे आवाहन रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ, जळगाव विभागांतर्गत रावेर बस स्थानकात सुरक्षित अभियान सप्ताहाच्या प्रारंभी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दीपक नगरे, विभागीय लेखाधिकारी मिलिंद सांगळे, स्थानक प्रमुख संदीप तायडे, वाहतूक निरीक्षक जयेश लोहार, वाहतूक नियंत्रक एस.के.शेख उपस्थित होते.



सुरक्षित प्रवास केवळ एस.टी.तून
तहसीलदार बंडू कापसे यांनी सांगितले की, बस दुरुस्ती करताना कुठलाही हलगर्जीपणा करता कामा नाही. मी माझी गाडी दुरुस्त करीत आहे, अशी भावना मनात ठेवावी. सर्व कर्मचार्‍यांनी प्रवासी हित जोपासून आपापल्या जबाबदारीचे पालन करावे. अनेक कर्मचारी बसच्या हितासाठी मनापासून सेवा बजावत असतात त्यांचे कौतुक आपण करायला हवे. सुरक्षित प्रवास केवळ राज्य परीवहन महामंडळाच्या बसमधून होत असल्याने एस.टी.ला प्रवासात प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. दीपक नगरे यांनी मार्गदर्शन केले. आगार व्यवस्थापक पाटील यांनी रावेर आगाराचा लेखा-जोखा मांडला. यशस्वितेसाठी योगेश जोशी, मनवर तडवी, लिपिक संजय तडवी, सुरेखा तायडे, कोकिाळा काळे, सदानंद महाजन, निलेश वाणी, डी.के.पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक संदीप तायडे यांनी केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !