काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरांनी हाती घेतला शिवधनुष्य : शिंदेंच्या सेनेत प्रवेश
Former Union Minister of Congress Milind Devara took up the bow: Sindh’s entry into the army
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस नेते आणि मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या 10 माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवधनुष्य हाती घेतला.
55 वर्षांचे नाते तोडले : देवरा
मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबत असलेले 55 वर्षांचे नाते तोडत आहे. आजच्या काँग्रेसला मोदींना विरोध एवढेच माहिती आहे. शिंदेंचे व मोदी शहांचे व्हिजन मोठे आहे. मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझे वडील मुरली देवरांना बाळासाहेब महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी शिंदेंनी मला प्रवेशाचे आमंत्रण दिले, खासदार होऊन मी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतो, असे देवरा म्हणाले.









