भुसावळ-कटनी एक्सप्रेस चार दिवस शॉर्ट टर्मिनेट
Bhusawal-Katni Express Four Days Short Terminate भुसावळ : जबलपूर विभागातील इटारसी-जबलपूर दरम्यान भिटोनी स्थानकात नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी भुसावळ विभागातून धावणारी भुसावळ-कटनी-भुसावळ ही गाडी इटाटरसीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी इटारसी ते कटनीपर्यत ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
14 ते 17 दरम्यान शॉर्ट टर्मिनेट
भुसावळ-कटनी एक्स्प्रेस ही गाडी 14 ते 17 जानेवारीपर्यंत इटारसी स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. कटनी-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 14 ते 17 जानेवारी या काळात इटारसी स्थानकातून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. गाडी कटनी-इटारसी स्थानकादरम्यान रद्द राहील. प्रवाशांनी या शॉर्ट टर्मिनेटबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.







