भुसावळातील नंदिनी नेवे उच्च शिक्षणासाठी लंडन रवाना


Nandini Neve from Bhusawal leaves for London for higher studies भुसावळ : शहराचे माजी नगरसेवक तथा अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुनील नेवे यांची कन्या अमृता उर्फ नंदिनी नेवे ही एम.एस. (सिव्हिल) च्या उच्च शिक्षणासाठी सोमवारी लंडन येथे रवाना झाली. तत्पूर्वी तिचा भुसावळात माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी सत्कार केला व उच्च शिक्षणासाठी शुभेच्छाही दिल्या.

बी.ई.त गोल्ड मेडल प्राप्त
नंदिनी हिचे शिक्षण भुसावळच्या सेंट अलॉयसीसमध्ये झाले असून नंतर पुणे येथील कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून डिप्लोमा सिव्हिल तसेच नामांकित झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रीसर्च या नामांकित कॉलेज मधून बी.ई. (सिव्हिल) चे शिक्षण तिने घेतले आहे शिवाय तिने गोल्डमेडल मिळवत प्रथम श्रेणीत बी.ई. पूर्ण केले आहे. यानंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ती सोमवारी मुंबई येथून विमानाने लंडनला रवाना झाल. मुलीला निरोप देताना प्रा.सुनील नेवे विनीता नेवे यांना गहिवरून आले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !