भुसावळात सायक्लोथॉनमधून 650 सायकलस्वारांनी दिला स्वच्छतेसह प्रदूषण मुक्तीचा संदेश
तीन विभागात झालेल्या स्पर्धेला मिळाला प्रचंड प्रतिसाद
650 cyclists in Bhusawal Cyclothon gave the message of cleanness and freedom from pollution
भुसावळ : शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आयोजित व आमदार संजय सावकारे प्रायोजित रोटरी सायक्लोथॉन स्पधेर्घत 650 सायकल स्वारांनी सहभाग नोंदवून प्रदूषण मुक्त, हरीत भुसावळचा नारा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवार, 15 रोजी सकाळी सहा वाजता रॅलीला सुरुवात झाली. 20 किमी, 10 किमी आणि पाच किमी अशा विभागात रॅली आयोजित करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा होता. रॅली दरम्यान कुणालाही इजा होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी रोटरी रेलसिटीचे सदस्य मार्गावर उभे राहून मार्गदर्शन करत होते. प्रचंड उत्साही वातावरणात रॅलीची सांगता झाली. आमदार संजय सावकारे, ओबेनोल केमिकलचे कल्पेश इंगळे, दलजीत चौधरी, विकास पाचपांडे, प्रोजेक्ट चेअरमन सुधीर पाचपांडे, आशिष पटेल आदी उपस्थित होते.
19 बक्षिसांचे केले वितरण
लकी ड्रॉ च्या माध्यमातून भाग्यवान स्पर्धकांची निवड करण्यात आली. तीन स्मार्ट वॉच, आठ सायकल हेल्मेट, पाच सायकल तसेच डे क्रिओलो केक शॉपतर्फे फूड हँपर अशी 19 बक्षिसे वितरीत करण्यात आली. यामध्ये चेतना वराडे, गौतम नागराणी, चैतन्य तायडे, जयेश चौधरी व कमलाकर पाटील यांना सायकलचे बक्षीस मिळाले.


नितीन राठोडांचे असेही दातृत्व
लकी ड्रॉ मध्ये भाग्यवान विजेते नितीन राठोड यांना सायकल बक्षीस म्हणून मिळाली होती परंतु त्यांनी मोठ्या मनाने माझ्याकडे नवीनच सायकल असून मला या सायकलचे काम नाही, असे जाहीर करून स्वहस्ते नवीन लकी ड्रॉ काढून आपल्याला मिळालेली सायकल ही लकी ड्रॉ मध्ये मिळालेल्या विजेत्याला दिली.





