भुसावळात 27 जानेवारी रोजी शरद पोक्षें यांचे व्याख्यान
Lecture by Sharad Pokshen on January 27 at Bhusawal भुसावळ : भुसावळ शहरातील प्रणिता प्रतिष्ठानतर्फे 27 जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर प्रख्यात अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान सप्तशृंगी माता मंदिर रंगमंच, के.नारखेडे शाळेजवळ, तापी नगर, भुसावळ येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर अनावरण शनिवारी श्रीराम मंदिरात करण्यात आले.
पोस्टर व टीजर रीलीज
या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने ‘पोस्टर आणि टीजर रिलीज’ असा छोटेखानी कार्यक्रम, शहरातील बाजार वॉर्डातील मोठ्या राम मंदिरात पार पडला. पोस्टर अनावरण डॉ.किशोर मोरे, गणेश वढवेकर यांच्याहस्ते तर टीजर रीलीज डॉ.वीरेंद्र झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन राधेश्याम लाहोटी, सुषमा खानापूरकर आदींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहरात व्यापक प्रसिध्दी केली जात आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रणिता प्रतिष्ठानचे मिलिंद धर्माधिकारी व सहकारी परीश्रम घेत आहेत.

