भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग
भुसावळ : शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन 2024 ‘डियुपीईएमएस ऑडसी’ चे उद्घाटन मध्य रेल्वेच्या डीआरएम इती पांडे यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. .
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.वैभव पाटील, प्रिन्सीपल अनघा पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अॅण्ड हॉस्पीटलचे डीन डॉ.प्रशांत सोलंकी, सुप्रीन्टेडंन्ट डॉ.प्रेमचंद पंडीत यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य, नाट्य सादर करीत दाद मिळवली. यावेळी शाळेतील शेकडो विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.


यावेळी डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, भुसावळातील सीबीएससीचे ज्युनिअर कॉलेज असलेले ही पहिली एकमेव शाळा आहे. गेल्या 23 वर्षापासून ही संस्था सुरू आहे आणि या संस्थेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे पुढे आयआयटी, इंजिनियर व इतर मोठे अधिकारी झाले. डीआरएम इती पांडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून खेळायला हवा. खेळल्याने आपल्या बॉडीतील ऑक्सीजन वाढतो, स्पोर्ट तुम्हाला जिंकणे व हारणे शिकवतो, तुमची संस्था ही नावाजलेली संस्था आहे येथून खूप चांगले विद्यार्थी घडून गेले असतील. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये असलेली ही शाळा पुढे अजून चांगले विद्यार्थी निश्चित घडवणार आहे. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मच्यार्र्यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन पूनम कुंडु व स्मिता भोलाणे यांनी केले.





