भरधाव बोलेरो दुभाजकावर आदळली : साकरी फाट्यावरील 21 वर्षीय युवक ठार


Speeding Bolero hits divider: 21-year-old youth killed on Sakari Phata भुसावळ :  भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात 21 वर्षीय युवक चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात रेल्वेउड्डाणपुलाजवळ घडला. देवेंद्र जालंदर पवार (21, साकरी फाटा, साई ढाब्याजवळ, भुसावळ) असे मयत चालकाचे नाव आहे.

डोक्याला मार लागल्याने मृत्यू
देवेंद्र हा तरुण आपल्या आई-वडील पत्नी आणि भावासोबत वास्तव्याला होता व चालक म्हणून दीपनगर येथील केंद्रात नोकरीला होता. बुधवार, 17 रोजी पहाटे चार वाजता बोलेरो गाडी क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.9616) ने भुसावळ येथून दीपनगर येथे तो येत असताना दीपनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन दुभाजकावर आदळले. या अपघातात देवेंद्रच्या डोक्याला मार लागल्याने त्यास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.



अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मित्र परीवार व नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. तरुणाच्या मृत्यूबाबात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !