भुसावळात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून अर्पित चौहान
Arpit Chauhan as Assistant Collector in Bhusawal भुसावळ : भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात सोमवार, 22 जानेवारी ते 1 मार्च या काळात भारतीय प्रशासन सेवेतील परीवेक्षाधीन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून अर्पित चौहान हे मंगळवारी, 23 जानेवारी रोजी पदभार घेणार आहे. त्यांचे कार्यालय हे प्रांत कार्यालयात असेल. भुसावळ तालुक्याचे काम ते पाहतील.
विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे आदेश काढले आहेत. प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर व बोदवड या दोन तालुक्यांचा पदभार राहणार आहे.

