वरणगावनजीक डिझेलचा टँकर उलटला : 40 लाखांचे डिझेल वाहिले
Diesel tanker overturned near Varangaon: Diesel worth 40 lakhs spilled वरणगाव : रीलायन्स कंपनीचे डिझेल टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर वरणगाव हद्दीत हिरामारोती पुलाजवळ शुक्रवार, 19 रोजी पहाटे टँकरचे पुढचे टायर फुटल्याने टँकर उलटले. या अपघातात चालक जखमी झाला. टँकर उलटल्याने डिझेलला गळती लागल्यने सुमारे 40 लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
टायर फुटल्याने उलटले टँकर
गुजरात येथून नागपूरकडे टँकर (जी.जे.12 बी.झेड.8928) मधून रीलायन्स कंपनीचे डिझेल घेवून चालक तिलोकाराम भागाराम जाट (32, रा.धारासार, ता.चौटन, जि.बाडमेर, राजस्थान) हा नागपूरच्या दिशेने निघाला होता मात्र हिरामारोती पुलाजवर टँकरचे पुढील टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला उलटून डिझेलची गळती सुरू झाली. नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी डिझेल लांबवले. तिलोकाराम भागाराम जाट यांचे खबरदारीवरून वरणगाव पोलिसात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


वाहनाचे चेसीस, कॅबीन, सात टायर व काच फुटल्याने तसेच टँकरमधील डिझेल रस्त्याच्या बाजूला सांडले गेल्याने सुमारे 40 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अपघातस्थळी सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, वाहतूक पोलिस कमलाकर राजहस, प्रशांत ठाकूर, मनोहर पाटील, योगेश पाटील, हितेंद्र जैन, साहेबराव कोळी यांनी धाव घेतली.
