येवतीच्या 14 शेतकर्‍याची शेती पंपाची केबल चोरीला


The farm pump cable of 14 farmers of Yevati was stolen जामठी : बोदवड तालुक्यातील येवती येथील शेतकरी विनोद दत्तात्रय शिंदे यांच्या गट क्रमांक 260/2/2/ब शिवारातील शेतातून सुमारे दोनशे फूट लांबीची केबल वायर बुधवारी मध्यरात्री शेत शिवाराचा वीजपुरवठा बंद होताच चोरट्यांनी लांबवली तर अन्य 13 शेतकर्‍यांच्या शेतातूनही वीज पंपाची केबल चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे.

भूरट्या चोरट्यांमुळे शेतकरी संतप्त
शेतकरी विनोद शिंदे हे सकाळी वीजपुरवठा असल्याकारणाने शेतात मोटर पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना आपली वायर चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी आपल्या शेजारील शेतकर्‍यांचा मोटर पंप व कुपनलिका चेक केली असता इतर 13 शेतकर्‍यांची वायर चोरीस गेल्याचे समोर आले. शेतकरी रामदास श्रावणे, सुधाकर माळी, राजू शिंदे, दत्तू धनगर, भागवत दांडगे, कृष्णा वाघ, उमेश वाघ, जगदेव वाघ, शिवाजी वाघ, मनोहर पाटील, अशोक ठाकूर, तुळशीराम वानखेडे आदींच्या शेतातूनही केबल चोरीला गेली आहे. शेतकरी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून युनूस तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !