भुसावळ विभागात मंदिरे सजली : श्रीरामांची छबी चौका-चौकात झळकली
भुसावळात दुचाकी रॅली ; शोभायात्रेसह कार सेवकांचा सन्मान ; दीपोत्सवाचे आयोजन : शहरात सर्वत्र राम नामाची धून
Temples decorated in Bhusawal division : Lord Rama’s image was seen in every square भुसावळ : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्व संध्येला भुसावळात रविवार, 21 रोजी सकाळी नाहाटा महाविद्यालय ते लोणारी समाज मंगल कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढून राम नामाचा गजर करण्यात आला तर विविध भागातून शोभायात्रा तसेच कलश यात्रा काढण्यात आल्या.
संपूर्ण शहरातील विविध भागात प्रभू श्रीरामांच्या छबी झळकल्या असून चौका-चौकात राम नामाची धूम कानी पडत आहे. संपूर्ण शहरात भगव्या पताका व झेंडे लावून शहर भगवेमय करण्यात आले आहे. दिवाळी सणापेक्षाही मोठा उत्साह भाविकांमध्ये आहे. शहरातील राम मंदिरावर आकर्षक रोशनाई करण्यात आली असून विविध कार्यक्रमांसह दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


दुचाकी रॅलीत रामनामाचा जयघोष
भुसावळ : शहरातील नाहाटा कॉलेजपासून रविवारी सकाळी नऊ वाजता वाद्याच्या तालावर दुचाकी रॅलीला सुरूवात झाली. जामनेर रोड, बाजारपेठ पोलिस ठाणेमार्गे लोणारी हॉलनजीक रॅली आल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या जीवनावर विविध गाणी वाजवण्यात आल्यानंतर त्यात आमदारांसह सारे नागरीक थिरकताना दिसले. यावेळी राम नामाचा जयघोषही करण्यात आली.
यांचा दुचाकी रॅलीत सहभाग
दुचाकी रॅलीत आमदार संजय सावकारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, युवराज लोणारी, मनोज बियाणी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नितीन धांडे, किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेडे, निक्की बत्रा, अजय नागराणी, अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, गौरव आवटे, बापू महाजन, गुणवंत बोरोले, मनीष सारंगधर पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले.





