धनाजी नाना महाविद्यालयात उद्यापासून तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन


फैजपूर : तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रशासन व व्यवस्थापन मंडळातील प्रत्येक घटकाचा यथोचित सन्मान व्हावा या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 23 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार, 23 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. पारंपरिक वेशभूषा, वक्तृत्व, काव्यवाचन, वादविवाद (सेमिनार हॉल) तर निबंध लेखन, केश रचना, नेल आर्ट, मेहंदी, रांगोळी स्पर्धा बुधवार, 24 रोजी सकाळी 10 वाजता होतील. अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र बी.वाघुळदे असतील. उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलसचिव डॉ.विनोद पी.पाटील असतील. सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सकाळी 11 वाजता संस्थाध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितील होतील. फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह आदींची उपस्थिती असणार आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !