कुर्हेपानाचे शिवारातून 14 हजारांची केबल कॉपर वायर लांबवली
14 thousand cable copper wire was extended from Kurhepanache Shiwar भुसावळ : शेतातून चोरट्यांनी 14 हजार 400 रुपये किंमतीची कॉपर केबल वायर लांबवल्याने शेतकर्यावर संकट कोसळले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
प्रकाश यशवंत पाटील (50, कुर्हेपानाचे, ता.भुसावळ) या शेतकर्याचे कुर्हेपानाचे गावाजवळील बोदवड रस्त्यावरील शेत-शिवारात शेत आहे. या शेतातून इलेक्ट्रीक पंपाची तब्बल 480 फूट कॉपर केबल चोरट्यांनी 20 ते 21 जानेवारीदरम्यान लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकर्याने पोलिसात तक्रार नोंदवली. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.


