फैजपूरातील धनाजी नाना महाविद्यालयात ‘धनोत्सवा’चा जल्लोष


फैजपूर :धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात 23 ते 25 जानेवारी असे तीन दिवस विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन ‘धनोत्सव’ ची सुरुवात झाली. यानिमित्ताने आज मंग्ळवार, 23 रोजी रांगोळी स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक पोषाख परिधान करून भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

निबंध स्पर्धेतील ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडली परखड मते
रांगोळी स्पर्धेत देशभक्ती, राम मंदिर राजनीतिक, सांस्कृतिक, सामाजिक, असे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा रांगोळ्या काढल्या. वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेले विषय अतिशय ज्वलंत होते. त्यात आजची तरुण पिढी, भारतासमोरील आव्हाने, तसेच विकसीत भारत या विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय अचूकपणे संदर्भ देत परखडपणे आपली मते मांडली तसेच मेहंदी स्पर्धेत सुद्धा विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सुबक कलाकृतीचे दर्शन घडविले. सर्व स्पर्धांमध्ये विजयी प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभात गौरवण्यात येईल. सर्व स्पर्धांसाठी महाविद्यालयातील विविध समिती प्रमुख परीत्तम घेत आहेत.



परीक्षक म्हणून प्रा.विजय सोनजे, प्रा.राजेंद्र राजपूत, प्रा.कल्पना पाटील यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वघुळदे यांनी या सर्व कला प्रकारांच्या मंचावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रसंगी उपप्राचार्य डॉ.व्ही.सी.बोरोले, डॉ.एस.व्ही.जाधव, स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.डॉ.राजश्री नेमाडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !