फेब्रुवारी महिन्यात अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनार्थ जाणे टाळा : केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांचा सल्ला


Avoid visiting Ramlalla in Ayodhya in February : PM’s advice to Union Ministers नवी दिल्ली : पाचशे वर्षानंतर अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहेत. प्रभू श्रीरामांच्या दर्शनार्थ जगभरातून भाविकांची गर्दी होत असल्यने केंद्रीय मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात दर्शनार्थ जाणे टाळावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्री मंत्र्यांना दिले आहे. अर्थात मंत्री दर्शनार्थ गेल्यानंतर प्रोटॉकॉलमुळे भाविकांना दर्शन घेण्यास विलंब, होईल अशी भावना त्यामागे आहे.

पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक नतमस्तक
सोमवार, 22 रोजी प्राणप्रतिष्ठा झालयानंतर पहिल्याच दिवशीच मंदिरात पाच लाख भविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.



मोदींनी दिला केंद्रीय मंत्र्यांना सल्ला
बुधवार, 24 रोजी केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात केंद्रीय मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात जावू नये, असा सल्ला दिला. व्हीआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळावे, असे सर्व केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री राम मंदिराच्या दर्शनासाठी जातील, असे सूत्रांनी सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !