बलशाली लोकशाहीच्या निर्मितीसाठी मतदान गरजेचे : प्रा.डॉ.सुनील नेवे

भालोद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा


Voting is necessary for building a strong democracy : Prof. Dr. Sunil Neve भालोद : बलशाली लोकशाहीच्या निर्मितीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करणे हा जसा आपला अधिकार आहे तसा कर्तव्याचा सुद्धा भाग आहे. प्रत्येक भारतीय नागरीकाने मतदार नोंदणी करून मतदान केलेच पाहिजे ती काळाची गरज आहे. सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक नागरीक बनवण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले. भालोद सेकंडरी एड्युकेशन सोसायटी संचालित कला व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे गुरुवार. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान गरजेची : प्राचार्य
अध्यक्ष प्राचार्य डॉ किशोर कोल्हे म्हणाले की, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी व आपल्या परीसरातील नागरीकांची मतदार नोंदणी करावी आणि भारतातील लोकशाही सदृढ सशक्त करावी. गावागावात जावून मतदान जागृती करावी. दिशा वारके व स्वाती सुरवाडे या विद्यार्थिनींनी अत्यंत मोहक अशी मतदान जागृती या विषयावर रांगोळी रेखाटली. प्रसंगी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. निबंध स्पर्धेत एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ऑनलाईन प्रशंमंजुषा स्पर्धा झाली. भालोद गावातील ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मतदार नोंदणीचे महत्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले. अभियानामध्ये नेहा बरडे, राजश्री महेश्री,किशोर महाजन, गिरीश चौधरी, युवराज बाणाईत, कुणाल कोळी, निखील ढाके, सागर सोनवणे, जयेश सोनवणे, निलेश सपकाळे हे विद्यार्थी सहभागी झाले.



यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, उपप्रचार्य प्रा.मुकेश चौधरी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे, प्रा.डॉ.अजयकुमार कोल्हे, प्रा.डॉ.दिनेश पाटील, प्रा.डॉ.आशुतोष वर्डीकर, प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.डॉ.मिनाक्षी वाघूळदे, प्रा.मोहिनी तायडे, प्रा.डॉ.किरण चौधरी, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.हेमलता कोल्हे, प्रा.डॉ.देवेंद्र बोंडे, चंद्रकांत लोखंडे उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !