प्रभू रामलल्लांच्या दर्शनाहून परतलेल्या महामंडलेश्वरांचे जंगी स्वागत
Mahamandaleshwar’s warlike welcome back from Ramlalla’s darshan फैजपूर : सतपंथ मंदिराचे गादिपती अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे श्रीक्षेत्र अयोध्या येथून श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून फैजपूर शहरात गुरुवार, 25 जानेवारी रोजी परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फैजपूर शहरातील आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात पूजन करून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या स्वागतार्थ फैजपूरात राम भक्तांचा जन समुदाय उसळला होता.
शिस्तबद्ध श्वानाने वेधले लक्ष
शोभायात्रा पुढे मार्गस्थ होत सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, गावातील श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, जुने हायस्कूल, न्हावी दरवाजा, रथ गल्ली, होलेवाडा, लक्कडपेठ, मोठा मारुती मंदिर, सतपंथ मंदिरानजीक आल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. शोभायात्रा मार्गाची स्वच्छता करून फुल रांगोळीचे सडा घालून सुशोभीत करण्यात आला. जागोजागी महाराजांवर पुष्प वर्षाव करण्यात आला तसेच माल्यार्पण करून औक्षण करून आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी सतपंथ महिला भजनी मंडळात एक श्वान अगदी शिस्तबद्धपणे अग्रभागी चालतांना लक्ष वेधून घेत होता, महाकाल पथक तसेच वारकरी भजनी मंडळ पथक, सर्व सामाजिक राजकिय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, नागरीक यांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.


सावदा येथे संतांचे भव्य स्वागत
सावदा : अयोध्या येथे भव्य राम मंदिर श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी सतपंथ मंदिराचे महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरिजि महाराज व सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी गेल्यानंतर दोन्ही संत अयोध्या येथून परतल्यनंतर त्यांचे जंगी भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बस स्थानकाजवळून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सजविलेल्या रथावर शास्त्री भक्तीकिशोरदासजी व महानुभाव दत्त मंदिर सावदा येथील महंत आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा व दुसर्या रथावर प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती व त्यास सात बैल जोड्या लावण्यात येऊन ओढण्यात आल्या. यावेळी सावदा शहरातील नागरीक, स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील मुख्य मार्गावरून निघून शोभायात्रा निघाल्यानंतर स्वामीनारायण मंदिराजवळ तिचा समारोप करण्यात आला.






