महसूल विभागाच्या प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा करणार : भुसावळचे सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान
Arpit Chauhan, Assistant Collector of Bhusawal ; will dispose of the pending works of the Revenue Department in a speedy manner भुसावळ : भुसावळचे नूतन प्रांताधिकारी म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील परीवेक्षाधीन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून अर्पित चौहान यांनी सोमवार, 29 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. 1 मार्चपर्यंत चौहान यांच्याकडे भुसावळचे प्रांताधिकारी म्हणून जवाबदारी असणार आहे.
यावेळी त्यांचे प्रांताधिकारी कार्यालयातील सहकार्यांकडून स्वागत करण्यात आले. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चौहान यांच्याबाबत नुकतेच आदेश काढले होते. भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर व बोदवड या दोन तालुक्यांचा पदभार आता राहणार आहे. दरम्यान, पदभार घेतल्यानंतर चौहान म्हणाले की, जळगाव येथे तहसीलदार म्हणून काम पाहिल्याने भुसावळ शहराची बर्यापैकी माहिती आहे. एक महिन्यांच्या काळात महसूल विभागातील प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासह महसूली वसुली वाढवण्यावर आपला भर असेल.








