भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात साडी डे उत्साहात


Saree Day in excitement at Sri Sant Gadgebaba Hindi College in Bhusawal भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक विभागातर्फे युवा उत्सव कार्यक्रमांर्गत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, स्पर्धा, मेहंदी हस्तकला व सलाद सजाव या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलींनी पारंपरीक साडी परीधान करून साडी डे साजरा केला. मुलांनीदेखील पारंपरिक वस्त्र परीधान करून विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
मुस्कान गोर या विद्यार्थिनीने साउथ इंडियन पद्धतीने साडी नेसून सक्रिय सहभाग घेतला तसेच महाराष्ट्रीयन पद्धतीने ही बहुसंख्या विद्यार्थिनींनी साडी परीधान करून साडी डे साजरा केला. याशिवाय मेहंदी स्पर्धा, हस्तकला, रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सर्व स्पर्धेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केले. परीक्षक म्हणून पांडव व प्रा.शिबा खान यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल, अनुपम शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.समता तायडे आदींनी परीश्रम घेतले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !