राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह पवार गटाला मिळाल्याचा यावलमध्ये जल्लोष
Jubilation in Yaval that the Pawar group got the watch symbol of NCP यावल : राष्ट्रवादी अजित पवार गटाची व चिन्ह देखील त्यांना अधिकृरीत्या निवडणूक आयोगाने दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत व जल्लोष राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहरातील भुसावळ टी पॉईंटवर एकत्र येत कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घड्याळ चिन्ह व पक्ष मिळाल्याबद्दल यावल येथे भुसावळ टी पॉइंट येथे जल्लोष करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष तथा कोरपावली सरपंच विलास नारायण अडकमोल, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष निलेश सपकाळे, रॉकी पाटील (शिरसाड), जितेंद्र सोनवणे (वढोदे), आकाश चोपडे (यावल), जुगल पाटील (यावल), सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष गणेश तायडे (शिरसाड), सुरेश महाजन (यावल), भैया माळी, गोलू महाजन, हितेंद्र महेश्वरी, निलेश पारखे, दीपक बारी, कालू कोळी सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.


सावदा येथेही आनंदोत्सव
सावदा : राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला मिळताच येथील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व घोषणाबाजी देऊन जल्लोष केला.
सावदा बस स्थानकाजवळ कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणा दिल्या. यावेळी राजेश वानखेडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वाधिक 42 आमदार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर इतर काही राज्यातही पक्षातील आमदार अजितदादां सोबतच आहे. या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत. आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीने लढू, असा विश्वास देखील यावेळी राजेश वानखेडे यांनी व्यक्त केला.






