चिनावलला भाविकांचा उसळला जनसागर : नवनाथ पारायणाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी


Devotees flock to Chinaval : Record breaking crowd at Navnath Parayana सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे शनिवार, 11 रोजी येथील श्री क्षेत्र नवनाथ मंदिरात धर्मनाथ Devotees flock to Chinavala: Record breaking crowd at Navnath Parayanaबीजनिमित्त चिनावल व रावेर यावल परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तगणांतर्फे भव्य नवनाथ पारायणासाठी भाविकांचा जनसागर उसळला. पारायणाचे यंदा 11 वे वर्ष आहे.

पाच हजार भाविकांची उपस्थिती
चिनावल शहरातील शरद बोरोले यांच्या प्लॉसमोर नवनाथ व कालिका माता यांच्या जागृत भव्य पटांगणात हे पारायण सकाळी आठ वाजेपासून सुरू झाले आहे. या पारायणाला केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर नागपूर, वर्धा, बुलढाणा, तसेच रावेर यावल, भुसावळ, जळगाव तालुका व परिसरातून पाच ते सहा हजार भाविक दाखल झाले आहेत. या ठिकाणी येणार्‍या भाविकांसाठी 900 श्लोकी नवनाथ ग्रंथ, आसन, नारळ पेढे, पाण्याची बाटली हे स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आले. चिनावलमधील श्री स्वामी समर्थ केंद्र व रावेर-यावल तालुक्यातील स्वामी समर्थ भक्तगणांकडून आयोजित एकदिवसीय पारायणाला महिलांची मोठी उपस्थिती होती.



शेकडो हातांनी दिली सेवा
पारायणासाठी सकाळी रामप्रहारापासूनच भव्य अशा पेंडालमध्ये महिलांनी पारायणांसाठी हजेरी लावली. उपस्थित भाविकांना चहा, साबुदाण्याचा फराळ, व संध्याकाळी उडीद दाळ (फौजदारी) प्रसाद म्हणून देण्यात आली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे 900 श्लोकी पारायण सुरू होते. यावेळी अरविंद कोलते, बाळू पाटील, शरद बोरोले, राजू पाटील, कृणाल बोरोले, अनिल किरंगे, भास्कर सरोदे, सुनील भंगाळे, आकाश भंगाळे, दामोदर महाजन, महेश बोडे, मनिष बोरोले, सागर भारंबे, तुषार भारंबे, दिनकर भंगाळे, सुधाकर पाटील, नरेंद्र फेगडे, महेद्र बोरोले, डिगंबर बोरोले, पप्पू लोखडे, दामोदर महाजन, नीळकंठ चौधरी, नीळकंठ गारसे, संजय भिरुड, यशवंत धांडे, कुणाल बोरोले, राजेंद्र भारंबे, मेहुल भारंबे, अनिल किरंगे, अजय महाजन, व चिनावल येथील शेकडो तरुण, तरुणी, स्त्री-पुरुषांनी या पारायणासाठी सेवा दिली.

गोपाल चैतन्य महाराजांची उपस्थिती
पारायणस्थळी पाल येथील गोपाल चैतन्यजी महाराज, श्री क्षेत्र डोंगरदा येथील स्वरुपानंद महाराज, सटाणा येथील कानीफनाथ संस्थानचे आदेश बाबा महाराज यांनी उपस्थिती देत आशीर्वचन दिले. युवा नेते धनंजय चौधरी व परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ही येथे हजेरी लावली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !