भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘प्रकल्प अहवाल’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
National Workshop on ‘Project Report’ at Nahata College, Bhusawal भुसावळ : कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्रा.डॉ.प्रशांत वारके, प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ.ममताबेन पाटील, कार्यशाळा संयोजक व व्यवस्थापन अभ्यासक्रम समन्वयक प्रा.स्मिता एन.बेंडाळे, कार्यशाळा समन्वयक प्रा.सपना जंगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.डॉ.प्रशांत वारके यांनी विद्यार्थी, संशोधन अभ्यासक, संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक यांना संशोधन प्रकल्प अहवाल या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन टी.वाय.बीबीएची विद्यार्थिनी अर्वा भारमल हिने केले. पाहुण्यांचा परीचय एफ.वाय.बीबीएचा विद्यार्थी लिअम यंग याने तर आभार प्रदर्शन कार्यशाळा समन्वयक प्रा.सपना जंगले यांनी मानले. संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील यांचे तसेच प्रा.खिलेश पाटील यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. यशस्वीतेसाठी डॉ.के.पी.पाटील, डॉ.रश्मी शर्मा, प्रा.स्वाती शेळके, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.एकता बजाज, प्रा.ललिता पाटील यांनी परीश्रम घेतले.








