पालकांनी संस्कार व शिस्तीचा राखावा समतोल : भुसावळात समुपदेशक आरती चौधरी

भुसावळत शहरातील किडल्स पॅराडाईज नर्सरीत रंगले वार्षिक स्नेहसंमेलन


Parents should maintain a balance of manners and discipline: Counselor Aarti Chaudhary in Bhusawal भुसावळ : मुलांसमोर रोल मॉडेल हे आई-वडीलच असतात त्यामुळे आई-वडीलांच्या वर्तनातुनच मुलांवर संस्कार होतात. पालकांनी संस्कार व शिस्तीचा समतोल राखला पाहिजे, असे विचार सक्षम कौन्सिलिंग सेंटर भुसावळच्या मॅनेजिंग डायरेक्टर व कौन्सिलर आरती सारंग चौधरी यांनी व्यक्त केले.

चिमुकल्यांनी केली कलागुणांची उधळण
शहरातील शारदानगर भागातील किडल्स पॅराडाईज नर्सरी व प्ले ग्रुपच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी आरती चौधरी यांनी मुलांचे संगोपन करताना संस्कार कसे करावे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन पालकांना केले. या कार्यक्रमामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या कलागुणांची उधळण करून आनंद घेतला. काही पालकांनी सुधदा कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.



यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी किडल्स पॅराडाईजच्या संचालिका डिंपल प्रमोद चौधरी आणि प्रमोद किसन चौधरी यांनी परीश्रम घेतले. नृत्य दिग्दर्शन हिमांशू अग्रवाल व काजल अग्रवाल यांनी केले. मनीषा चौधरी, श्रद्धा बोंडे, वैशाली ढाके, बोंडे ओम कुमार, अनुष्का चौधरी, पूजा अराक, अनिल आराक, राजेंद्र सरोदे, राजेंद्र चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले हा कार्यक्रम कमल गणपती हॉलमध्ये झाला. ऋतुजा चौधरी यांनी सूत्रसंचालन करीत आभारही मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !