भाजपाचे 400 पारचे लक्ष मात्र 40 पार पण होणार नाहीत : उद्धव ठाकरे यांची सडकून टिका


BJP’s target of 400 pars but 40 pars will not be achieved : Uddhav Thackeray’s criticism मुंबई : भाजपाने 400 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले असलेतरी त्यांना 40 जागादेखील मिळणार नापहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ठाकरे गटाकडून सोनई, शिर्डीत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ठाकरे यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर देखील टोला लगावला. ”अशोक चव्हाण भाजपात गेले. कालपर्यंत आमच्यासोबत बसून जागावाटपाबाबत चर्चा करत होते. मोदींनी चव्हाण यांच्यावर आरोप केले होते असा एक व्हिडिओ समोर आला होता. शहीद कुटुंबाचा अपमान अशोक चव्हाणांनी केला, असे मोदी म्हणाले होते, असेही ठाकरे म्हणाले.

प्रसारमाध्यमांवर सरकारचा दबाव
ठाकरे म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी काम करू म्हणतात, पण दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे होणारे आंदोलन दाखवलं जात नाही. कारण प्रसारमाध्यमांवर सरकारचा दबाव आहे”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आता राज्यकर्त्यांच्या नालायक कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे. माझी जनता इथले ‘पंच’ आहेत. ही जनताच पंचनामा करणार आहे. संकटाच्या छाताडावर चालून जाणारा हीच माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे.



अश्रुधूर कशासाठी, शेतकरी असाच रडतोय
काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍याला हमीभाव मिळत नाही, पण गद्दारी करणार्‍याला खोक्यांचा भाव मिळतोय, अश्रुधूर कशासाठी सोडताय? माझा शेतकरी असाच रडतोय! असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांबद्दल मला आदर आहे, पण आज त्यांच्या डोक्यावर भ्रष्ट आणि उपरे बसवले जात आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !