वरणगावातील संतोष माळी यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश
Santosh Mali from Varangaon joins Shinde group of Shiv Sena वरणगाव : वरणगावातील शिवसेना (उबाठा) गटाचे चे शहरप्रमुख संतोष माळी आणि उपतालुकाप्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी यांनी शुक्रवार, 16 फेब्रुवारी शुक्रवारी कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शिंदे गटात प्रवेश केला.
शिंदे गटाची वाढली ताकद
जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी हे कट्टर शिवसैनिक खूप वर्षांपासून होते. संतोष माळी यांनी शिवसेना (उबाठा) च्या शहरप्रमुखपदी असताना शहरातील विविध नागरी समस्यांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवून आंदोलने देखील केली होती. शिवसेना (उबाठा) चे शहरात त्यांनी शाखा आणि संघटन चांगल्या प्रकारे उभे केले होते. आता संतोष माळी शिवसेना शिंदे गटात गेल्याने वरणगावमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवून पक्ष संघटना मजबूत होणार आहे.








