भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा महाविद्यालयात 20 रोजी राष्ट्रीय कार्यशाळा


Bhusawal Art Science and P.O. O. National Workshop on 20th at Nahata College
भुसावळ :
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि भुसावळातील माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फायनान्शिअल फिटनेस जिम’ या विषयावर मंगळवार, 20 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत एक दिवसीय कार्यशाळा वाचनकक्षात आयोजित करण्यात आली आहे.
व्यावसायीक, उद्योजक, दुकानदार, गुंतवणूकदार इत्यादी क्षेत्रातील सर्व नागरीकांसाठी ही राष्ट्रीय कार्यशाळा खुली आहे. प्रत्येक सहभागी सदस्याला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत बढे कॅपिटलचे संस्थापक ज्ञानेश्वर बढे हे मार्गदर्शन करतील.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक असतील. प्रमुख उपस्थिती म्हणून चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील उपस्थित राहतील. या कार्यशाळेत जास्तीत-जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !