भुसावळात भर दिवसा देना नगर भागात तीन घरे फोडली

70 ग्रॅम सोन्यासह एक लाख 65 हजारांच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला


Three houses were broken into in Dena Nagar area in Bhusawal during the day
भुसावळ :
भुसावळ शहरातील देना नगर भागातील अरीहंत प्लाझा या अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तीन बंद घरे फोडीत घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोकड लांबविली. यात तिन्ही घरांमधील 70 ग्रॅम सोने व एक लाख 65 हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे कारने पसार झाले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

भर दिवसा घरफोड्या झाल्याने खळबळ
शहरातील देना नगरातील अरीहंत प्लाझा या अपार्टमेंटमध्ये राजेंद्र रामसेवक गोरार वास्तव्यास असून त्यांचे जामनेर रोडवर अंकल चहा नावाचे दुकान आहे. ते व त्यांच्या पत्नी सकाळी सहा वाजता चहाच्या गाडीवर आले असता प्लॅट बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. गोरार यांच्या घरातून 20 ग्रॅम सोन्याचे दागिणे व 75 हजार रुपये रोख लांबवण्यात आले तसेच याच अपार्टमेंटमधील रहिवासी दिवाकर कृष्णराव हिंगोणेकर हे रेल्वेतील निवृत्त कर्मचारी वास्तव्यास आहेत. ते मुलगा व सून हे हॉस्पीटलमध्ये गेले असता प्लॅट बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी साधत घरातून 30 ग्रॅम सोने व 65 हजारांची रोकड लांबवली. याच अपार्टमेंटमधील रहिवासी मयुर सोनवणे यांचे प्लॅस्टीकचे दुकान आहे. ते दुकानात आल्यानंतर प्लॅटला कुलूप असल्याने चोरट्यांनी संधीचे सोने करीत दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत घरातील 20 ग्रॅम सोने, चांदीच्या वस्तू व 25 हजारांची रोकड लांबवली. या अपार्टमेंटमध्ये 16 प्लॅट आहते.



तिन्ही प्लॅटमध्ये झालेल्या चोरीची माहिती घर मालकांना त्यांच्या शेजार्‍यांनी दिली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी माहिती घेतली. घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी यंनी भेट देऊन पाहणी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !