भुसावळात स्पा सेंटरआड वेश्या व्यवसाय : दाम्पत्य कोठडीत ; शौकीन ग्राहक पोलिसांच्या रडावर

रेक्स रॅकेटचे बडे व्यापारी, अधिकारी ग्राहक : पोलिसांकडून चॅटींग डेटावरून होणार कारवाई


Bhusawalat Spa Center Near Prostitution Business : Couple In Custody ; Avid consumers on police cries भुसावळ (7 मार्च 2025) : स्पा सेंटर आड महेश नगरात बिनबोभाट सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून दोन आंबट शौकीन ग्राहकांना पकडले होते तर पाच तरुणींची सुटका करीत त्यांची सुधारगृहात रवानगी केली होती. दरम्यान स्पा सेंटर आड वेश्या व्यवसाय चालवणार्‍या विशाल बर्‍हाटे व पल्लवी बर्‍हाटे या दाम्पत्यावर पीटा अन्वये कारवाई केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली व कोठडीची मुदत संपताच दाम्पत्याची न्यायालयीन कोठडीत रवानी करण्यात आली.

रेल्वे, ऑर्डनन्स, दीपनगरासह शहरातील बडे व्यापारी ग्राहक
वेश्या व्यवसायाचे बिंग बाहेर न पडण्यासाठी दाम्पत्य मोबाईलवरून व्यवसाय चालवत होते. व्यवसायासाठी पुणे, अहमदनगर भागातून तरुणींना शुक्रवारी ट्रेनने भुसावळात बोलावले जात होते व ग्राहकाशी डिल करण्यासाठी मोबाईलवर मुलींचे फोटो पाठवून चॅटद्वारे डिल फायनल केली जात होती. भुसावळातील रेल्वे, ऑर्डनन्स, दीपनगर तसेच शहरातील बडे काही व्यापारी संबंधित दाम्पत्याच्या संपर्कात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बर्‍हाटे यांचा मोबाईल ताब्यात
पोलिसांनी बर्‍हाटे यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्याद्वारे कुणा-कुणाशी चॅटींग केले याची माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे. कुंटणखान्यातील तरुणींची छायाचित्रे कुणा-कुणाला पाठवण्यात आली याची चौकशी केली जात आहे. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !