इंग्रजीच्या पेपराला कॉपी : यावलच्या डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांसह चौघांविरोधात गुन्हा
Copy to English paper: Yaval’s Dr. A case against four including center head at Zakir Hussain Urdu High School Examination Centre यावल : यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये गुरुवारी इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना या परीक्षा केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी तपासणी केली असता त्यांना एका ब्लॉकमधील विद्यार्थिनी कॉपीचा कागद बाहेर फेकताना दिसल्याने त्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली या केंद्रावरील केंद्रप्रमुखांसह पर्यवेक्षक अशा चार जणांवर कारवाईचे आदेश दिले. यावल पोलीस ठाण्यात गटशिक्षण अधिकारी यांच्या फिर्यादीवरून परीक्षा केंद्रावर गैर प्रकाराबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ
यावल शहरातील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर गुरुवारी इंग्रजीचा पेपर सुरू असताना दुपारी दोन वाजता फैजपुर विभागीय कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी भेट दिली. वर्गात तपासणी करीत असतांना त्यांना ब्लॉक क्रमांक सहामध्ये एक विद्यार्थिनी कॉपीचा कागद वर्गाच्या बाहेर फेकतांना दिसताच त्यांनी थेट परीक्षेचे कामकाज पाहणार्या गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांना संपर्क साधत यावल पोलीस ठाण्यात बोलवून घेतले व त्यांच्या आदेशान्वये केंद्रावरील केंद्रप्रमुख एफ.एच.खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉक क्रमांक 6 चे पर्यवेक्षक एस. एस. सोनवणे, मुख्याध्यापक जी.एन.खान या चार जणांविरुद्ध गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंधक अधिनियम 1982 चे कलम 7,8 कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

